नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले [ प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात.ते गुण जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा त्याची कला बनते.हीच कला कालांतराने छंद,आवड बनते आणि माणूस त्या छंदाने झपाटला जातो.त्या झपाटलेपणाला जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा रत्नदीप बारबोले होतो.होय..योग्य मार्गदर्शनामुळेच घडलेल्या जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांचा हा जीवनसंघर्ष...] माढा तालुक्यातील सीना दारफळ हे एक गाव..आणि त्या गावातील बळीराम बारबोले हा अशिक्षीत पण जिद्दी माणूस! शेतीत काही नाही,नोकरीच महत्त्वाची असे त्यांचे विचार...! स्वतः अडाणी असुनही धाकट्या भावाला शिकवून नोकरी लावायची ही त्यांची जिद्द.आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काबाडकष्ट करुन भावाला इंजिनियर बनवले.आता आपल्याला सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच जे प्रत्येक घरात घडते तेच त्याही घरात घडले.हात पोहोचल्यानंतर आपल्यासाठी कुणी किती खस्ता खाल्ल्या हे माणसाला आठवत नाही.ते घरही याला अपवाद नव्हते. असा हा दुखावलेला आणि मनात काही ठरवून पुन्हा जिद्दीला पेटलेला माणूस.पत्नी...
ज्यांची जाहिरात..त्यांचीच वरात अशा आजच्या परिस्थितीत कैक संघर्ष कथा जगासमोर कधीच येत नाहीत.त्या संघर्ष कथा प्रेरणा News च्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे.बस्स इतकेच!