नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले [ प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात.ते गुण जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा त्याची कला बनते.हीच कला कालांतराने छंद,आवड बनते आणि माणूस त्या छंदाने झपाटला जातो.त्या झपाटलेपणाला जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा रत्नदीप बारबोले होतो.होय..योग्य मार्गदर्शनामुळेच घडलेल्या जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांचा हा जीवनसंघर्ष...] माढा तालुक्यातील सीना दारफळ हे एक गाव..आणि त्या गावातील बळीराम बारबोले हा अशिक्षीत पण जिद्दी माणूस! शेतीत काही नाही,नोकरीच महत्त्वाची असे त्यांचे विचार...! स्वतः अडाणी असुनही धाकट्या भावाला शिकवून नोकरी लावायची ही त्यांची जिद्द.आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काबाडकष्ट करुन भावाला इंजिनियर बनवले.आता आपल्याला सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच जे प्रत्येक घरात घडते तेच त्याही घरात घडले.हात पोहोचल्यानंतर आपल्यासाठी कुणी किती खस्ता खाल्ल्या हे माणसाला आठवत नाही.ते घरही याला अपवाद नव्हते. असा हा दुखावलेला आणि मनात काही ठरवून पुन्हा जिद्दीला पेटलेला माणूस.पत्नी...
फिनिक्स शेतकरी - दत्ता सुतकर [ वय अवघे ३२ वर्षे..पण बऱ्या-वाईटाचा खूप अनुभव घेत,जिद्दीने आणि एका ठराविक ध्येयाने कठीण परिस्थीतीतही मनाचा तोल ढळू न देता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आणि सगळे संपले आहे असे वाटत असतानाच 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे भरारी घेणाऱ्या सौंदणे ता.मोहोळ येथील दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.मुळातच सौंदणे व आसपासचा भाग हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो.या भागावरच अनेक साखरसम्राट गबरगंड झाले.पण शेतकरी आहे तिथेच आहे.ज्याने ऊस केला नाही तो कामातून गेला अशा दृष्टीने इतर लोक ऊसपीक न घेणाऱ्या शेतकऱ्याकडे बघत असतात.मात्र दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याने ऊसपीकाकडे पूर्णपणे पाठ फिरवून वेगळा मार्ग अवलंबला आणि त्यांची आता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल सुरु आहे.अशा जिद्दी शेतकऱ्याची ही विस्मयकारी वाटचाल....] साधारण वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे २००५ सालापासून शेतीची जबाबदारी अंगावर पडलेले दत्ता सुतकर यांचे ते वय म्हणजे तसे नाकळतेच होते.त्यामुळे इतर शेतकरी करतात तशीच त्यांच्या शेतीचीही सुरुवात झाली.ऊसाची टिपरी बुडवायची,वारे...